सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी व राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने राजा शिवाजी चौक येथे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, दिलीप पवार ,बंड्या तोरस्कर संजय सागावकर, दीपक सावंत तसेच सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, संजय पेडणेकर, प्राध्यापक सतीश बागवे, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे उपस्थित होते.