Home राजकारण ठाण्यातून ही गुंडगिरी मूळासकट उखडून टाकण्याची हिंमत शिवसैनिकांमध्ये आहे! उद्धव ठाकरे

ठाण्यातून ही गुंडगिरी मूळासकट उखडून टाकण्याची हिंमत शिवसैनिकांमध्ये आहे! उद्धव ठाकरे

90

शिवसैनिक शांत राहिलेत याचा अर्थ ते सर्वोच्च न्यायालयाने सरकारला म्हटलं तसं नपंसुक नाही. जर मनात आणले तर ठाण्यातून ही गुंडगिरी मूळासकट उखडून टाकण्याची हिंमत शिवसैनिकांमध्ये आहे. ताबडतोब गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. बिनकामाचा आयुक्त यांना निलंबित करा आणि कणखर आयुक्त ठाण्याला दिला पाहिजे. अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाण्यात युवती कार्यकर्तीला झालेल्या मारहाणीनंतर त्यांनी हॉस्पिटलला जाऊन जखमी पदाधिकाऱ्याची विचारपूस केली. यावेळी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला नपंसुक म्हटलं, त्याची प्रचिती ठाण्यात आली. ठाण्याची ओळख ही शिवसेनेचे ठाणे, जीवाला जीव देणाऱ्या, महिलांचे रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचे ठाणे, धर्मवीर आनंद दिघेंचे ठाणे, सुशिक्षित आणि सुसंस्कृत ठाणे अशी ओळख आहे. ही ओळख पुसून गुंडाचे ठाणे असं करण्याचा एक प्रयत्न सुरू झाला आहे. आजपर्यंत मी गँग ऐकलं होतं. आता महिलांची गँग, महिला गुंडगिरी करू लागल्या तर आपल्या देशाचे, राज्याचे, ठाण्याचे काय होणार असा प्रश्न सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनात आहे असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत त्यांनी काही करावं आणि आम्ही ऐकून घ्यायचं असं नाही. आता या क्षणाला आम्ही यांची गुंडगिरी ठाण्यातून काय महाराष्ट्रातून उखडून फेकून देऊ शकतो. जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर गुंड आणि तोतये शिवसैनिक जे बाळासाहेबांचा फोटो, भगवा झेंडा घेऊन नाचतायेत त्यांना हा अधिकार नाही. महिला गुंडाकरवी हल्ले करणारे हे नपंसुकच म्हटले पाहिजे पोलीस आयुक्तांना भेटायला गेलो पण आयुक्तच नाहीत. गुंड महिलांनी हल्ला केला, या महिला संस्कृतीत बसणाऱ्या नाहीत. व्हिडिओ आहेत, हल्लेखोरांची नावे आहेत. मातृत्वाचा उपचार घेणारी रोशनी तरी तिला पोटावर लाथा मारल्या असं निघृण काम करणारी माणसे ठाण्यात नव्हे तर महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीची नाहीत असा घणाघात ठाकरेंनी केला. राज्य मंत्रिमंडळात गुंड पोसणारं खातं निर्माण करावं गुंडगिरी वाढत चालली आहे. पत्रकारांना धमक्या दिल्या जातायेत, महिलांना मारहाण केली जातेय. फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. गुंडागर्दीचं राज्य सुरू असून आता मुख्यमंत्र्यांना गुंडमंत्री म्हणायचं. मी म्हणत नाही पण हे लोकं ठरवतील. प्रत्येकाकडे खाते असते. मंत्रिमंडळात विशेष खाते निर्माण करून त्यात गुंड पोसण्याचं काम करणाऱ्या खाते द्यावे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.