Home स्टोरी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अनिल हरी परुळेकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी...

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अनिल हरी परुळेकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन

71

सावंतवाडी वार्ताहर: मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळातील शिवसेनेचे कडवट शिवसैनिक व माजी जिल्हाप्रमुख अनिल हरी परुळेकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी गुरुवार दि.२ मार्च रोजी रात्री ८:३० वाजता अल्प आजाराने दुःख निधन झाले. डॉ जयेंद्र परुळेकर यांचे ते काका होते. आज सावंतवाडी माठेवाडा येथे त्यांच्या राहत्या घरी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत त्यांना अंतदर्शना साठी ठेवण्यात येणार आहे.