Home स्टोरी शिवसेना कणकवलीच्या वतीने उद्या शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्सव.

शिवसेना कणकवलीच्या वतीने उद्या शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्सव.

136

शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन.

 

कणकवली: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कणकवलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे उद्या गुरुवार दि २८ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजता कणकवली शहर कार्यालयात (प्रांत ऑफिस समोर) शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्सव साजरा करण्यात येणार आहे.त्यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी यावेळी कणकवलीतील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, तालुका संघटक राजू राठोड, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, शहरप्रमुख रुपेश नार्वेकर यांनी केले आहे.