Home स्टोरी शिवप्रेमी यशवंतगड रेडी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४२ रक्तदात्यांनी घेतला सहभाग...

शिवप्रेमी यशवंतगड रेडी यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४२ रक्तदात्यांनी घेतला सहभाग .

137

वेंगुर्ले: धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासप्रित्यर्थ रेडी येथील शिवप्रेमी यशवंतगड रेडी (दुर्गरक्षक प्रतिष्ठान, रेडी) यांच्या वतीने रेडकर हॉस्पिटल अॅड रिसर्च सेंटर रेडी येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४२ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

 

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना कपटाने औरंगजेबाने कैद करून त्यांचे ४० दिवस अतोनात हाल करून त्यांना मारण्यात आले. संभाजी महाराजांच्या त्यागाची, बलिदानाची आठवण गत ४ वर्षे शिवप्रेमी यशवंतगड रेडी ह्यांच्याकडून आदरांजली म्हणून बलिदान मासामध्ये रक्तदान शिबीर आयोजित करून केली जाते.

 

रक्तदान शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे, अशा सामाजिक कार्यात आणि गडसंवर्धनाच्या कार्यात आमचे आपणास नेहमीच सहकार्य राहील, असे डॉ. मोहन जगताप यांनी यावेळी सांगितले. तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे गोवा समन्वयक संजय पिळणकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात शिवप्रेमी यशवंतगड रेडी ही संस्था बलिदान मासात गेली ४ वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असून ही संस्था प्रत्येक रविवारी यशवंत गड किल्याची साफसफाई आणि डागडुजी स्वखर्चाने करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे मोठे कार्य करीत आहे, त्यांच्या कार्यास यावेळी शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. मोहन जगताप, सिव्हिल हॉस्पिटल ओरोस रक्तपेढीच्या डॉ. पल्लवी सुरवसे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग-गोवा समन्वयक संजय पिळणकर, राजेंद्र कांबळी, भूषण मांजरेकर, सौ. समृद्धी पिळणकर, राजेश पेडणेकर, नारायण तेंडुलकर, श्रीकृष्ण कोंडुसकर, नारायण गडेकर, सचिन कोंडये, राजाराम चिपकर, वैभव आसोलकर, सुकन्या परब, सरोज परब, ज्ञानेश्वर राणे, सायली म्हापणकर, श्रेया परब, मिनल पंडित, प्रसाद नाईक, चक्रपाणी गवंडी, मनोज नाईक, सेजल राऊत यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने व छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

 

यावेळी खरोबा युवा मित्रमंडळ सदस्य, मातोंड नानेलीवाडी, सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ, सावंतवाडी, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान वेंगुर्ले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्यातील संस्थांनी ह्या रक्तदान शिबिराला विशेष भेट देऊन शुभेच्छा दिल्या.