सावंतवाडी शिवरायांचे विचार आणि आचार खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी सावंतवाडी खासकीलवाडा भागातील शिवप्रसाद कला क्रीडा मंडळ व शिवधर्म प्रतिष्ठान कार्यरत आहे. या मंडळांनी या भागातील समाजाला आदर्शवत आणि गुणवंत म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे डॉक्टर,शिक्षक, सैनिक यांचा गौरव केला. हे कार्य निश्चितच आजच्या समाजाला दिशादर्शक आहे. हे मंडळ सावंतवाडीला भूषणावह व असे कार्य करत आहे. अशा शब्दात सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब व अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे परब या दोन्हीही व्यक्तींनी दोन्ही मंडळांचे कार्याचे कौतुक केले. सावंतवाडी येथील न्यू खासकीलवाडा, चराटा, गावडेशेत जवळील शिवप्रसाद कला क्रीडा मंडळ व शिवधर्म प्रतिष्ठान या दोन्ही मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सवादिनी या भागातील आदर्शवत व्यक्तींचा गौरव सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष संजू परब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला नेत्या अर्चना घारे परब, मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या महिला तालुकाध्यक्ष संजना परब, ॲड अनिल निरवडेकर,माजी नगरसेवक विलास जाधव, मानव अधिकार संस्थेचे अमित वेंगुर्लेकर, शिवप्रसाद कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गुरु गावडे, शिवधर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पांचाळ, दादा नगनुर, बालरोगतज्ञ डॉ दत्तात्रय सावंत, स्त्री रोग तज्ञ डॉ नेत्रा सावंत, माजी सैनिक हवालदार सुरेश गावडे, सेवानिवृत्त शिक्षक श्री किशोर नाडकर्णी, तबलावादक बंड्या धारगळकर, शिवप्रसाद कला क्रीडा मंडळाचे व शिवधर्म प्रतिष्ठानचे पदाधिकारी निखिल गावडे, संदेश रेडकर, लक्ष्मीकांत उर्फ बबलू पांचाळ, रवींद्र गोसावी, सौ सुचिता गावडे, रमाकांत पांचाळ, अमय रेडकर, अक्षय रेडकर, काशिनाथ वारंग, शिवा गावडे, राज पांचाळ, आर्यन पांचाळ, आर्यन कुमावत, अभि पवार, बंटी गवस, मसुराज वडार, ऋतुराज आरोंदेकर, कुमार अनुज, श्री गावडे, सौ पांचाळ, यश यादव आधी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर दत्तात्रय सावंत यांचा नागरी सत्कार संजू परब यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. तर डॉक्टर नेत्रा सावंत यांचा सत्कार अर्चना घारे परब यांच्या हस्ते करण्यात आला. तर माजी सैनिक हवालदार सुरेश गावडे यांचा सत्कार बबलू पांचाळ, शिक्षक नाडकर्णी यांचा सत्कार गुरु गावडे, तर संजू परब यांचा सत्कार महेश पांचाळ, अमित वेंगुर्लेकर यांचा सत्कार संदेश रेडकर, दादा नगनूर यांचा सत्कार रवींद्र गोसावी, अर्चना घारे यांचा सत्कार संजना परब यांच्या हस्ते करण्यात आला. बंड्या धारगळकर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ सावंत म्हणाले या सत्काराने मी भारावून गेलो आहे. या मंडळाने आम्हा दोन्हीही उभयतांचा जो गौरव केला त्याबद्दल आम्ही नेहमी त्या मंडळांचे ऋणी राहणार. शिवरायांचे विचार आचार तरुणाने आचरणात आणावे ते म्हणाले
यावेळी सौ घारे परब म्हणाल्या शिवप्रसाद कला क्रीडा मंडळ व शिवधर्म प्रतिष्ठान गेली दहा-बारा वर्ष सामाजिक भावनेतून कार्य करत आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे. सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या व्यक्तींचा जो सत्कार केला असे सत्कार व्हायला हवेत. हीच खरी समाजसेवा आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, उपस्थित यांचे आभार ॲड संतोष सावंत यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. फोटोमध्ये सावंतवाडी येथील शिवप्रसाद कला क्रीडा मंडळ व शिवधर्म प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या गौरव सन्मान कार्यक्रमात बोलताना संजू परब, बाजूला अर्चना घारे परब, संजना परब, डॉक्टर दत्तात्रय सावंत, डॉक्टर नेत्रा सावंत, एडवोकेट अनिल निरवडेकर, विलास जाधव, शिक्षक नाडकर्णी सुरेश गावडे, महेश पांचाळ, गुरु गावडे आधी