Home शिक्षण शिवप्रतिष्ठान फणसे मुंबई प्रतिष्ठानच्यावतीने बांदिवडे – कोईळ शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप!

शिवप्रतिष्ठान फणसे मुंबई प्रतिष्ठानच्यावतीने बांदिवडे – कोईळ शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप!

142

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून शिवप्रतिष्ठान फणसे मुंबई या प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोईळ या ग्रामीण भागातील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग,वह्या, पेन, पेन्सिल,पाउच इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. “शैक्षणिक मदतीचा लाभ घेत शालेय विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी व गावचे नाव उंचावत ठेवावे,” असे आवाहन शिवप्रतिष्ठांच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती कोईळ अध्यक्ष श्री .निलेश साटम, आशा सेविका उर्मिला आठवले, हर्षदा साटम, श्रद्धा साटम, श्रुतिका साटम, सृष्टी कदम, शर्मिला साटम, शिक्षिका वर्षाराणी सुरवसे, मुख्याध्यापक श्री. गणेश सुरवसे उपस्थित होते. “शिवप्रतिष्ठान फणसे मुंबई या संघटनेच्या सदस्यांची ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रती असलेली दानशूर वृत्ती खरोखरच कौतुकास्पद आहे,” असे उद्गार यावेळी बोलताना सौ. वर्षाराणी सुरवसे यांनी काढले.