Home स्टोरी शिक्षिका कु. नाझिया शेख फातिमा शेख आदर्श शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कारांने सन्मानित

शिक्षिका कु. नाझिया शेख फातिमा शेख आदर्श शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कारांने सन्मानित

176

सावंतवाडी प्रतिनिधी: विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या मातोश्री पार्वती राऊत विद्यालय, इंग्रजी माध्यम (मुक्काम पोस्ट रेडी, हुडावाडी तालुका – वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग) शाळेच्या सहाय्यक शिक्षिका कु. नाझिया शेख यांना सावंतवाडी येथे, कास्ट्राईब शिक्षक संघटना द्वारे आयोजित, वर्ष २०२४- राज्यस्तरीय शिक्षण परिषदेमधे, कोकण मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते फातिमा शेख आदर्श शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष आकाश तांबे मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष वामन तर्फे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर तांबे. गटशिक्षणाधिकारी संजय माने, संतोष गोसावी. अनिल राणे दिलीप शितोळे. विठ्ठल गवस अनिल कांबळे संजीव मोहिते. आधी उपस्थित होते . आदर्श शिक्षिका नाझिया शेख यांनी आदर्श व असे त्यांचे कार्य आहे त्यांना फातिमा शेख आदर्श शिक्षिका पुरस्कार संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आला त्याचे वितरण शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आदर्श शिक्षिका म्हणून त्यांचा सन्मान गौरव करण्यात आला आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे