मोदींच्या कार्यकाळात शिक्षणाला नाही तर, निवडणुकीला जास्त महत्व आहे. संबंधितांवर कारवाई करा, युवासेनेची मागणी…! योगेश धुरी,युवासेना तालुकाप्रमुख
कुडाळ प्रतिनिधी: शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात अचानक शालेय परीक्षा रद्द झाल्याने मुलांची तारांबळ उडाली. शिक्षणमंत्री यांच्या जिल्ह्यातच ही परिस्थिती मग संपूर्ण महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल? भाजप सरकार मोठे मोठे दावे करत आहे परंतु ग्रामीण भागात ही परिस्थिती आहे, मोदींच्या कार्यकाळात शिक्षणाला नाही तर निवडणुकीला जास्त महत्व आहे. असं युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी म्हटलं आहे.
योगेश धुरी पुढे म्हणाले की, राणे, सामंत, केसरकर सातत्याने उद्धव साहेबांवर, आदित्य साहेबांवर टीका करतात परंतु आदित्य साहेबांच्या संकल्पनेतून मुंबई महानगर पालिकेच्या शाळा प्रवेश हाऊस फुल्ल आहेत. एवढं चांगला शिक्षणाचा दर्जा निर्माण केला आहे. दुसरीकडे केसरकरांच्या हातात शिक्षण खाते आल्यावर शिक्षणाचे तीन तेरा वाजवले आहेत. जिल्ह्यातील बेरोजगारांवर अन्याय, चुकीच्या पद्धतीने संच मान्यता, आणि आतां परीक्षाच रद्द झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सत्तेत असून ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष देता येत नाही आणि महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या म्हणे. परीक्षा रद्द केल्या कारण निवडणुकी चे ट्रेनिंग पण, शनिवारी परीक्षा घेऊन रविवारी निवडणुकिचे ट्रैनिंग लावता आले असते. परंतु अश्याप्रकारे मुलांचे मानसिक खच्चीकरण केले गेले. यासंदर्भात युवासेना मुख्यकार्यधिकारी, शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई ची मागणी करणार आहे.