Home क्राईम शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि सतीश खरे यांच्या कारागृहातील मुक्कामात वाढ!

शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि सतीश खरे यांच्या कारागृहातील मुक्कामात वाढ!

123

१० जून वार्ता: बडतर्फ मुख्याध्यापकाकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि ३० लाखांची लाच स्वीकारणारे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. श्रीमती धनगर व खरे यांच्या जामीन अर्जावर शुक्रवार दि. ९ जून रोजी होणारी सुनावणी सोमवार दि. १२ जून पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या कारागृहातील मुक्कामात वाढ झाली आहे.

सुनीता धनगर
सतीश खरे

नाशिक रोड परिसरातील एका शिक्षण संस्थेने बडतर्फ केलेल्या मुख्याध्यापकाकडून महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी ५० हजार रुपयांची तर लिपिक नितीन जोशी याने पत्र काढण्यासाठी ५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती २ जून रोजी महापालिकेतील दालनात स्वीकारली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ लाच स्वीकारताना अटक केली होती. दोघेही गेल्या बुधवारपर्यंत (ता.७) पोलिस कोठडीत होत्या. सध्या त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत.