Home स्टोरी शिक्षक समिती सावंतवाडीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

शिक्षक समिती सावंतवाडीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

177

सावंतवाडी: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षक समिती तालुका शाखा सावंतवाडी यांच्यावतीने आज दिनांक २० जुलै २०२४ रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

या सामाजिक दायित्वाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर ऐवळे, डॉक्टर वजराटकर, शिक्षक समितीचे माजी जिल्हाध्यक्ष आद. भाई चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक, शिक्षक समिती सावंतवाडी अध्यक्ष समीर जाधव, सरचिटणीस श्री हेमंत सावंत व शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

२२ जुलै २०२४  होणाऱ्या या वर्धापन दिनानिमित्त शिक्षक समितीच्या २२ शिलेदारांनी रक्तदान केले. यामध्ये अमोल कोळी, तुषार आरोसकर, भारत बांदेकर, समीर जाधव, हेमंत सावंत, नारायण नाईक, विश्राम ठाकर, ओमनाथ क्षीरसागर, अपय्या हिरेमठ, आशिष तांदुळे, दिलीप चव्हाण, सुजीत पवार, प्रशांत मडगावकर, अमोल सासवडे, परेश नाईक, पांडुरंग होंडे, अमित पिळणकर, प्रकाश शिंदे, किरण सावर, पंकज बिद्रे, सतीश राऊळ, प्रवीण शेर्लेकर* यांनी रक्तदान केले.

आजच्या मानवतेच्या या कार्यक्रमावेळी माजी जिल्हाध्यक्ष आद. भाई चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष कल्याण कदम आवर्जून उपस्थित राहिले. मनीषा गावडे, अतुल कोळी, जे. डी. पाटील, उदेश नाईक, केशव जाधव, सुधीर गावडे, विदयाधर पाटील, प्रवीण कुडतरकर, राहुल वाघधरे, विष्णू चौधरी, मुरलीधर उमरे, दिपक जाधव हे शिक्षक समिती शिलेदार रक्तदान उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य केले. सर्व रक्तदात्याचे शिक्षक समिती परिवाराकडून मनःपूर्वक आभार व अभिनंदन.