Home क्राईम शिक्षकेला लग्नाचे आमिष आणि नंतर शारीरिक संबंध ठेवून तिच्याशी लैंगिक अत्याचार

शिक्षकेला लग्नाचे आमिष आणि नंतर शारीरिक संबंध ठेवून तिच्याशी लैंगिक अत्याचार

131

रायगड: – येथील एका शिक्षकेबरोबर सोशल मीडियाचा वापर करून प्रथम मैत्री त्यानंतर लग्नाचे आमिष आणि नंतर शारीरिक संबंध ठेवून तिच्याशी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आरोपी विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणातील आरोपीने एक वर्षांपूर्वी पीडित महिलेशी सोशल मीडिया वरून ओळख करून घेतली, त्यानंतर तिच्याशी मैत्री करून प्रेम संबंध निर्माण केले. याने तिला लग्नाची आम्हीच दाखवून अनेक वेळा शारीरिक लैंगिक अत्याचार केले. त्याचबरोबर पीडित महिलेला वेगवेगळे कारण दाखवून ११ लाख ८० हजार रुपये घेतले. काही दिवसांनी त्याने पीडित महिलेबरोबर संबंध कमी करत लग्नाला नकार दिला. याच्या वागण्यामध्ये बदल झाल्याची लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने रक्कम परत मागितली. परंतु त्याने रक्कम देण्यास टाळाटाळ केली . त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे कळून चुकले यावेळी पीडित महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे