Home Uncategorized शिकाल तर टिकाल आणि”पुस्तक”वाचल तर वाचाल हे ब्रीद वाक्य असले तरी ते...

शिकाल तर टिकाल आणि”पुस्तक”वाचल तर वाचाल हे ब्रीद वाक्य असले तरी ते खरे आहे! प्रा.माशाळे

277

म्हसळा प्रतिनिधी:२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन आणि थोर साहीत्यीक शेकस्पियर यांचा जन्म दीन म्हणून साजरा केला जातो. सार्वजनिक वाचनालयाच्या उपाध्यक्षा सौ अपर्णा ओक यांच्या अध्यक्षतेखालीपुस्तक प्रदर्शन आणि पुस्तके आणि वाचन संस्कृती तसेच ग्रंथालयांचे महत्व या विषयी चर्चासत्राचे आयोजन सकाळी ११ वा.करण्यात आले. या कार्यकामांत प्रा.आर.एस. मशाळे यानी चल-अचल संपत्ती वाटली तर ती संपते मात्र पुस्तक वाचून ज्ञान रुपी संपत्ती वाटली तर ती वाढते त्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्याची वाचनालयाची आणि वाचकांची परस्पराना आवश्यकता आहे.वाचनालयाचे माध्यमातून वाचनाचे महत्व पटवून देऊन जागतीक पातळीवर अनेकांचे पुस्तकांविषयी महत्व सांगण्याचे प्रयत्न सुरू आहेत म्हणुन २३ एप्रिल हा दिवस खास करून विश्व पुस्तक दिवस साजरा करण्यात येतो असे सांगितले. आपल्याकडे असलेले किंवा अवगत झालेले ज्ञान “कॉपी राईट”करणे अर्थात ग्रंथात नमुद करुन ते सर्वांना पुस्तक रुपात अवगत होण्यासाठी प्रसिध्द करणे बाबतची म्हसळा सार्वजनिक वाचनालयाचे विश्वस्त वसंतराव नाईक कॉलेजचे ग्रंथपाल प्रा.माशाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले.या वेळी कार्यक्रमाचे आयोजक संचालक सदस्य सुनिल उमरोटकर, सचिव अशोक काते,जेष्ठ संचालक अ.रजाक् मेमन,ग्रंथपाल उदय करडे,वाचक रविंद्र मुद्गुळ,संभाजी शिंदे,श्रीमती प्राची मेंदाडकर,अनेक वाचक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक संचालक सुनिल उमरोटकर,सचिव अशोक काते,जेष्ठ संचालक अ.रजाक् मेमन,ग्रंथपाल उदय करडे,संभाजी शिंदे, वाचक रविंद्र मुदगूळ,श्रीमती प्राची मेंदडकर, उपस्थित होते. प्रा.माशाळे यांनी मराठी साहित्यीक, लेखक, कवी, कादंबरीकार, चरित्र, आत्मचरित्र, काव्य संग्रह, कवी, कवयित्री यांच्या साहित्याची माहिती विषद करून देताना खास करून शांता शेळके यांनी लिहिलेले नापास मुलांची गोष्ट, किरण बेदी यांच्या डेरर, बेडेकर यांचा रणांगण,विश्वास पाटिल यांचा महानायक,दिवे गेलेले दिवस आदी पुस्तकातील लेखकांचे दर्जेदार लेखनाची सविस्तर माहिती दिली.

पु.ल.देशपांडे,व्यंकटेश माडगुळकर, सुधीर फडके, वि.स. खांडेकर,वि.ग.कानिटकर,भालचंद्र नेमाडे, गोविंदाग्रज, राम गणेश गडकरी,सेक्सपियर, डॉ बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी,शिवाजी सावंत, आण्णा भाऊ साठे, हरी नारायण आपटे, रणजित देसाई यांच्या लेखन साहित्याची माहिती दिली. सुनिल उमरोटकर यांनी पुस्तक वाचना बरोबरच मंत्पुष्पांजली ,गायत्री मंत्र पठण वाचुन ते सातत्याने मनन केल्यास शारीरिक व्याधी दूर होण्यासाठी मदतीचे होते अशा प्रकारच्या साहित्यात काही कमी नाही याची महत्वाची माहिती दिली अ. रज्जाक मेमन यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.उपस्थित मान्यवरांचे हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले. स्वागत व आभर सचिव अशोक काते यांनी मानले.यावेळी ग्रंथालया मार्फत कॉन्टीनेंटल,राजहंस,मेहता पब्लीकेशन्स, हिंदुस्थान प्रकाशन, जोत्स्ना प्रकाशन  चाणाक्य मंडल दिलिपराज प्रकाशन,परममित्र पब्लिकेशन, यांची पुस्तके, संदर्भग्रंथ, शिवरायांचा इतिहास, संपूर्ण महाभारत, भारताचे संविधान, असे शिक्षक असे उपक्रम, इंग्रजी मराठी हिंदी ऐतिहासिक प्राचीन भारतीय शब्दकोश, यादवकालीन मराठीभाषा,शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, कला संभाषणाची इत्यादी अनेक विषयांवरची पुस्तके, प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते  ते २३ व २४ एप्रिल या कालावधीत सुरू रहाणार आसल्याचे ग्रंथपाल करडे यानी सांगितले .फोटो