Home स्टोरी शिंदे फडणवीस सरकारद्वारा वीज बिलामध्ये वाढ

शिंदे फडणवीस सरकारद्वारा वीज बिलामध्ये वाढ

115

सिंधुदुर्ग: महागाईने जनता होरपळली असताना महाराष्ट्राच्या शिंदे फडणवीस सरकारने एक एप्रिल पासून सर्वसामान्य जनतेला वीज अनामत रक्कम व वीज बिल वाढ करून मोठा शॉक दिला आहे. आता विज बिल दर महिन्याचे एक आणि अनामत रकमेचे एक अशी दोन बिले प्रत्येक घरात दिली जात असल्याने वीज वितरण कंपनीचे चालले तरी काय? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. विज अनामत रक्कम दरवर्षी वाढवून वीज वितरण कंपनी यातून साध्य काय करत आहे. आता एक एप्रिल पासून अनामात रक्कम वाढवताना शंभर पाचशे एक हजार अशा पटीत अनामत रक्कम वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.