Home राजकारण शिंदे-फडणवीस यांच्यासह १५ मंत्री पोहरादेवीत; देवेंद्र फडणवीस यांनी केली ही महत्त्वाची घोषणा

शिंदे-फडणवीस यांच्यासह १५ मंत्री पोहरादेवीत; देवेंद्र फडणवीस यांनी केली ही महत्त्वाची घोषणा

53

बंजारा हा प्राचीन समाज आहे. जुन्या संस्कृतीतही बंजारा समाजाचा अंश आहे. लकीरशहा बंजारा यांच्या तांड्यात तीन लाख सैनिक होते. ५० लाख जनावरं होते.वाशिम येथे ५९३ कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी केली. बंजारा भाषेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी फडणवीस म्हणाले, बंजारा समाजासाठी पैशाची कमतरता कमी पडू देणार नाही. शिंदे यांनी मला तिजोरी दिली. त्यांनी सांगितलं, ही तिजोरी बंजारा समाजासाठी उघडून टाका. १३७ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. आता काम थांबू देणार नाही. बंजारा भवन, आजूबाजूच्या परिसराचा विकास केला जाईल.