मी राष्ट्रवादीतच राहणार आहे, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर मत व्यक्त केले आहे. अंधारे यांनी भाजपला लक्ष्य करत, भाजपनेच वावड्या उठवल्याचं म्हटलं. तसेच “अब तेरा क्या होगा कालिया… “असे म्हणत शिंदे गटाच्या आमदारांवर टीकाही केली होती. आता या टिकेला शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे. ते जाणिवपूर्वक भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू आहे. वज्रमूठ सभा तसेच इतर सभा पाहता मुद्दामहून खोड करण्याची कार्यपद्धती भाजपची सुरू आहे. मात्र आता सुरू असलेल्या राजकारणावरून शिंदे गटाच्या आमदारांची काळजी वाटत असल्याचं अंधारे यांनी म्हटलं. तसेच अजित पवार यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेवरुन शिंदे गटाचे बेगडी हिंदुत्व उघडे पडत आहे. राष्ट्रवादीसोबतची अनैसर्गिक युती आता नैसर्गिक कशी झाली? असा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटातील आमदार आणि नेत्यांना, “अब तेरा क्या होगा कालिया…” म्हणत सुषमा अंधारे यांनी टोला लगावला. त्यावर, आता शितल म्हात्रे यांनी पलटवार केला आहे.