Home शिक्षण शासकीय शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांसह गणवेश, बूट आणि वह्या शासनाकडून मिळणार! शिक्षणमंत्री दीपक केसरकर

शासकीय शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांसह गणवेश, बूट आणि वह्या शासनाकडून मिळणार! शिक्षणमंत्री दीपक केसरकर

53

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: यापुढे राज्यातील सर्व शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गणवेश, बूट आणि वह्या शासनाकडून दिल्या जाणार आहेत. इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे साहित्य दिले जाणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून यावर कार्यवाही होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शिक्षणमंत्री दीपक केसरकर मत मांडतांना म्हणाले, ‘‘भारत हा तरुणांचा देश आहे. तरुणांना स्वावलंबी करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण मोलाचे आहे. त्यामुळे येणारी पिढी ही तंत्रकुशल असायला हवी, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे प्रयत्न चालू आहेत.’’

शिक्षण मातृभाषा मराठीतूनच घ्या! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा. ज्या देशांनी मातृभाषेचे महत्त्व वेळीच ओळखले त्या रशिया, फ्रान्स, जर्मनी, इस्रायल या देशांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रगती केली. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर मातृभाषेचा आग्रह धरला. इंग्रजी ही केवळ आंतरराष्ट्रीय संवाद साधण्याची भाषा आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठीतून अभियांत्रिकी, वैद्यकीय हे अभ्यासक्रम इंग्रजीसह त्या-त्या राज्याच्या मातृभाषेतूनही शिकवले जाणार आहेत. त्यामुळे मुलांमध्ये आतापासूनच मातृभाषेविषयी प्रेम निर्माण करा. आपल्या मराठी या मातृभाषेतून शिक्षण घ्या.