मालवण प्रतिनिधी: निरोगी निरामय शरीरासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे नुकतेच योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नॅशनल योगा ॲथलेटिक खेळाडू योगशिक्षिका निकिता लाड यांनी योगाचे विविध प्रकार व आसने यावेळी प्रत्यक्षिका सह दाखविली. यावेळी कॉलेजचे टी.व्ही मिटके, अपर्णा आवरे, अमृता गुळवे,सोनल रासम आदी शिक्षक व विध्यार्थी सहभागी झाले होते. कॉलेजच्या वतीने योगशिक्षिका निकिता लाड यांचे आभार मानण्यात आले