Home राजकारण शासकीय जाहिरातींमध्ये केवळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचीच छायाचित्रे वापरता येतील….

शासकीय जाहिरातींमध्ये केवळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचीच छायाचित्रे वापरता येतील….

53

शासकीय जाहिरातींमध्ये केवळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचीच छायाचित्रे वापरता येतील, अन्य मंत्र्यांची नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दाखविण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. याततून मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करून कार्यक्रमातील छायाचित्रे वापरण्यात येत आहेत.शासकीय तिजोरीतील उधळपट्टीतून मंत्र्यांच्या जाहिरातींना चाप लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका प्रकरणात चार-पाच वर्षांपूर्वी निर्णय देताना न्यायालयाने केवळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे वापरण्याची परवानगी दिली होती. मंत्र्यांची नावे किंवा कार्यक्रमांची छायाचित्रे जाहिरातीत वापरता येतात. केंद्र व राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार शासननिर्णयही जारी केला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शिवजयंतीनिमित्त रविवारी प्रसिद्धीमाध्यमांमध्ये दिलेल्या जाहिरातीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे नाव आहे.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वतंत्र छायाचित्राऐवजी कार्यक्रमातील छायाचित्र वापरून नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळविण्यासाठी आतापर्यंत दोन हजार कोटी रुपये खर्च झाले असून लवकरच या बाबी उजेडात येतील, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला. संजय राऊत यांना आशिष शेलार प्रत्यूत्तर दिलं आहे.शहांविषयी बोलताना राऊत यांनी आपली पात्रता ओळखावी, असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिला आहे. दोन हजार कोटी रुपयांमध्ये शिवसेना नाव व चिन्ह विकत घेतल्याच्या आरोपावर शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकमान्य टिळकांच्या केसरीतील अग्रलेखातील उल्लेखांचा दाखला देत शेलार यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.