Home राजकारण शरद कोळी यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल

शरद कोळी यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल

103

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. त्यानंतर या टिकेला प्रत्युत्तर देत ठाकरे गटाचे शरद कोळी यांनी नितेश राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नितेश राणेंची औकात नाहीये. त्यांना अक्कल नाही. पिसाळलेली कुत्री कपडे फाडत असतात. नितेश राणे कपडे फाडायचा विचार डोक्यात आणू नको, शिवसैनिक तुला फाडून खातील, असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे.सत्तेचा माज आणू नको तुझ्यापेक्षा खालच्या भाषेत आम्हाला बोलता येते.नितेश राणे तुझं बोलणं योग्यता सोडून पुढे जात आहे, अवकातीत राहा, असंही ते म्हणालेत. २०२४ साली राणे आणि तुझ्या सरकारला सगळ्यांना गुवाहाटी-गुजरातला ही जनता पाठवणार आहे. संजय राऊतच काय शिवसैनिकही तुझ्या बापाला सुद्धा भीत नाहीत. आदित्य साहेब खानदानी वाघ आहेत. तुम्ही राणे ही कोंबडीचे पिल्ले आहेत, असंही शरद कोळी म्हणालेत. कोंबडीच्या आवाजाची मिमिक्री करत शरद कोळी यांनी नितेश राणे यांची खिल्ली उडवली आहे. शरद कोळी TV 9 शी बोलत होते.