Home स्टोरी वि. स. खांडेकर विद्यालयात सीड बॉल व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन….

वि. स. खांडेकर विद्यालयात सीड बॉल व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन….

124

सावंतवाडी प्रतिनिधी: वि. स. खांडेकर विद्यालय सावंतवाडी येथे ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून नगरपरिषद सावंतवाडी नियोजित केलेल्या माझी वसुंधरा अभियान २०२३ वर्ष ४ थे मेरी मिट्टी मेरा देश हा उपक्रम राबविण्यात आला. सीड बॉल व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकानी नगरपालिका कर्मचारी उद्यान पर्यवेक्षक गजानन परब, माजी विद्यार्थी शेखर सुभेदार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उद्यान पर्यवेक्षक गजानन परब यांनी सीड बॉल संदर्भात निसर्ग रक्षणासाठी मार्गदर्शन व माहिती दिली. सीड बॉल म्हणजे माती मिश्रित गांडूळ खत शेण वगैरे मातीचा बॉल करून त्यामध्ये बिया रोवल्या जातात व ते सीड बॉल जंगलात पारस बाग परिसरात फेकले असता पावसाच्या पाण्याने त्या बी ला माती असल्याने अंकुर फुटतो व रोप येऊन झाडे तयार होतात. या पद्धतीने रोप निर्मिती होते. यामुळे सीड बॉल उपक्रम शासनाने हाती घेतला आहे.

मुख्याधिकारी श्री सागर साळुंखे यांचे माझी वसुंधरा अभियान उपक्रमाला मोलाचे योगदान लाभते. वि. स. खांडेकर विद्यालयाला नगरपरिषद माध्यमातून विविध फुलझाडे व फळझाडे देऊन वृक्षारोपण करण्यात आले. निसर्ग रक्षणासाठी उपस्थित सर्वांनी हरितशपथ घेतली व आपल्या वाढदिवसाला वृक्षारोपण करून “झाडे लावा झाडे जगवा” असा संदेश देण्यात आला.

शिक्षक दिनाला शाळेचे माजी विद्यार्थी शेखर सुभेदार यांनी शिक्षकांना फुल झाड भेट दिली. या कार्यक्रमाला नगरपरिषद कर्मचारी, उद्यान पर्यवेक्षक गजानन परब, दत्तात्रय सावंत फोंडेकर, शेखर सुभेदार वि.स.खांडेकर विद्यालय मुख्याध्यापक श्री पवार सर, श्री माळी सर, श्री परीट सर, सौ. शृंगारे मॅडम घोगरे मॅडम शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.