Home स्टोरी “विहान थिएटर्स” ची यशस्वी घोडदौड..!  “अनपेक्षित ” हे नवं कोरं दोन अंकी...

“विहान थिएटर्स” ची यशस्वी घोडदौड..!  “अनपेक्षित ” हे नवं कोरं दोन अंकी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

394

मसुरे प्रतिनिधी: “विहान थिएटर्स ” निर्मित आणि निलेश रमेश जाधव लिखित आणि दिग्दर्शित ” सात बारा ” , ” अवचिन्ह “ हि दोन्ही दोन अंकी व्यावसायिक नाटकं प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून या नाटकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे . यावर्षी ” विहान थिएटर्स ” निर्मित आणि निलेश रमेश जाधव लिखित आणि दिग्दर्शित ” अनपेक्षित “हे नवं कोरं दोन अंकी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतंय , “विहान थिएटर्स” च्या याही नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभो हीच अपेक्षाविहान थिएटर्सचे संस्थापक श्री . निलेश रमेश जाधव यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षात अनेक एकांकिकांमध्ये ,महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य स्पर्धा तसेच मानाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा यामंध्ये सहभाग घेऊन तसेच नाथ हा माझा , फुलाला सुगंध मातीचा, आई ची कटकट , आवताण ..यायचं ह..! या आणि अश्या अनेक व्यावसायिक नाटकांचे प्रयोग करत , वेगवेगळ्या नाट्यसंस्थांसोबत काम करत तसेच मराठी मालिका माझा होशील ना .. चिमणराव गुंड्याभाऊ, गुलमोहर, वर्तुळ या मध्ये भूमिका केल्या आहेत .हे सगळं करत असताना २०१८ साली त्यांनी ” विहान थिएटर्स ” या नाट्यसंस्थेची स्थापना केली.

विहान थिएटर्स च्या माध्यमातून अनेक एकांकिका आणि नाटकं वेगवेगळ्या स्पर्धेत सादर झाली आणि बक्षिसं मिळवत नाटकांचे व्यावसायिक प्रयोग हि चर्नीरोड च्या साहित्य संघ मंदिर तसेच दादर च्या श्री छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर येथे यशस्वी रित्या पार पडले.

“विहान थिएटर्स” मधील प्रत्येक कलाकार हा नोकरी सांभाळून तितक्याच तत्परतेन नाटकाच्या तालमी करून अगदी जोमाने नाटकाचा प्रत्येक प्रयोग सादर करतो आणि नोकरी सांभाळून सुद्धा आपल्यात असणारी नाट्यकला जपता येते याच ” विहान थिएटर्स ” हे एक उत्तम उदाहरण आहे आणि हेच ” विहान थिएटर्स ” च वेगळेपण आहे .

आज वेग वेगळ्या क्षेत्रातील स्वतःची एक ओळख असणारे सर्व जण एकत्र येऊन नित्य नियमाने अगदी प्रामाणिक पणे नाटकाच्या तालमी करून ” विहान थिएटर्स ” च प्रत्येक नाटक प्रेक्षकांपुढे अगदी सच्चे पणाने सादर करतात हे खरच कौतुकास्पद आहे .

“विहान थिएटर्स ” च्या माध्यमातून केलेल्या ” शहाणा कोण तो कि आपण ? , आणि या वर्षी केलेल्या ” कबंध ” या शॉर्टफिल्म ला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ” शॉर्ट फिल्म फेस्टिवल्स ” मध्ये पंचवीसहुन अधिक पारितोषिकं मिळाली आहेत.

विहान थिएटर्स चे कलाकार श्री.नितीन सदानंद म्हापसेकर -कक्ष अधिकारी, राजशिष्टाचार विभाग, मुंबई उच्च न्यायालय, गाव – तळवडे, तालुका – देवगड, जिल्हा – सिंधुदुर्ग यांनी “कबंध” या शॉर्ट फिल्म साठी सेव्हन सिस्टर इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल, थायलंड गरुडा इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल, धनबाद इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल आणि इंडियन इंटरनॅशनल फिचर अँड शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये

“सर्वोत्कृष्ट अभिनेता” या पारितोषिकावर आपल्या उत्कृष्ट अभिनयाने मोहोर लावली आहे,श्री. नितीन म्हापसेकर यांनी या आधीही विहान थिएटर्स च्या “अवचिन्ह ” या दोन अंकी व्यावसायिक नाटकात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.तसेच या सोबतच” कबंध ” या शॉर्ट फिल्म मधील अनिकेत मोरे, डॉ. प्रदीप नींदेकर आणि मयुरा निलेश जाधव यांनीही या आणि इतर शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये त्यांच्या उत्तम अभिनयासाठी पारितोषिके पटकावली आहेत.