मसुरे प्रतिनिधी: विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणेचे श्री. अंकुश माने यानी मालवण तालुक्यातील तिरवडे येथील श्रीमती सरिता संतोष शिंदे यांच्या काजू युनिटला शुक्रवारी भेट दिली. तसेच काजू प्रक्रिया युनिटची पाहणी करून माहिती घेतली. श्रीमती सरिता शिंदे यांनी कृषी विभागातील प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना (पी एम एफ एम ई) योजनेचा लाभ घेऊन हे युनिट चालू केल्याची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी PMFME योजना जिल्हा समन्वयक श्री. जबाक मालदार आणि कृषी विभाग अंतर्गत तालुका कृषी अधिकारी मालवणी यांनी आपल्याला या योजनेची परिपूर्ण माहिती देऊन तसेच सर्व प्रकारचे सहकार्य करून हे युनिट उभारण्यासाठी मदत केली अशी माहिती दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग श्री.दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. ओहोळ , तालुका कृषी अधिकारी श्री.व्ही.जी.गोसावी कृषी पर्यवेक्षक धामापूर श्री. एस.जी. परब, कृषी सहाय्यक श्री.पवनकुमार सौंगडे, लाभार्थी तसेच शेतकरी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी मालवण श्री. विश्वनाथ गोसावि यांनी या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.फोटो: तिरवडे येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजने मधून उभारलेल्या काजू युनिटची पाहणी करताना विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणेचे श्री. अंकुश माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग श्री.दिवेकर, तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी व अन्यछाया: पेडणेकर