Home शिक्षण विभव राऊळ हा शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात तृतीय.

विभव राऊळ हा शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात तृतीय.

60

सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वीत या परीक्षेत सावंतवाडी येथील मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल या शाळेचा विद्यार्थी कु. विभव विरेश राऊळ हा सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादीत शहरी विभागात जिल्ह्यात तिसरा व सावंतवाडी तालुका गुणवत्ता यादीत शहरी विभागात तालुक्यात दुसरा आलेला आहे. विभव यांस मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर, प्रेरणा भोसले, फरजाना मुल्ला, योगेश चव्हाण, गोविंद प्रभू, लवीना आल्मेडा, सुनीता मयेकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विभवच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखनराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले, मंडळाचे संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, तसेच तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विभव याने इयत्ता पाचवीत देखील गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्ती प्राप्त केली होती.