Home स्टोरी विध्नहर्ता सोसायटी मधील अनधिकृत बांधकामा विरोधात तक्रारदार करणार मुख्यालयासमोर आमरण उपोषण!

विध्नहर्ता सोसायटी मधील अनधिकृत बांधकामा विरोधात तक्रारदार करणार मुख्यालयासमोर आमरण उपोषण!

233

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड):- कल्याण पूर्वेतील प्रभाग ९ आय अंतर्गत असलेल्या अनमोल गार्डन जवळील विध्नहर्ता सोसायटीच्या तळ मजल्या वरील वाहन तळावर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ तक्रारदाराने येत्या ८ मे रोजी पासुन महापालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे .विध्नहर्ता सोसायटीत सदस्य असलेले अशोक गायकवाड आणि सौ .अक्षता गायकवाड हे तळ मजल्यावर रहात आहेत . तळ मजल्यावर वाहन पार्कींग साठी रिकामी जागा आहे . या जागेवर तक्रारदार अशोक गायकवाड यांच्या कुटूंबियांच्या सदनिकेला लागूनच आणि या कुटुंबाला विश्वासात न घेता अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे या बांधकामामुळे या कुटुंबियांना अडचणीला सामोरे जावे लागणार असल्याची तक्रार हे बांधकाम सुरु होताच या कुटूंबाने प्रभाग ९ आय कार्यालय तसेच पालिकेच्या नगररचना विभागात केली होती . परंतु या तक्रारीची दखल न घेता पालिकेच्या संबंधीत अधिकार्‍यांनी या अनधिकृत बांधकाम निर्मितीस सहकार्य केल्याचे तक्रार दाराचे म्हणणे आहे . हे अनधिकृत बांधकाम निष्कासित होत नसल्याच्या निषेधार्थ तक्रारदार सौ .अक्षदा अशोक गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयासमोर दि . ८ मे २०२३ पासून आमरण उपोषणास परवानगी द्यावी अशा आशयाची लेखी मागणी पोलिस निरिक्षक बाजारपेठ पोलिस ठाणे तसेच प्रभाग अ चे सहाय्यक आयुक्त यांचेकडे केली आहे . या मागणी पत्राची प्रत मा . सहाय्यक आयुक्त प्रभाग ९ आय कार्यालयालाही देण्यात आली आहे .कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने दिलेल्या माहिती नुसार २७ फेब्रुवारी २०२३ ते २३ एप्रिल २०२३ या सरासरी दोन महिन्यांच्या कालावधीत महापालिकेच्या एकूण १० प्रभागांपैकी प्रभाग ८ ग मध्ये सर्वात कमी म्हणजे २ ठिकाणच्या ९० अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे तर सर्वाधीक तब्बल १९ ठिकाणच्या १०० अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे .याच प्रभाग ९ अंतर्गत असलेल्या विध्नहर्ता गृह संकुलातील वाहन तळावर झालेल्या अनधिकृत बांधकामाची सत्यता तपासण्यासाठीही दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी कलम २६० व २६७ (१) नुसार संबंधीतांना नोटीस देवून दि . २५ एप्रिल २०२३ रोजी बांधकामाच्या वैद्यते बाबत कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले असल्याचे समजते . या कागदपत्रांच्या तपासणीअंती आता हे बांधकाम वैद्य की अवैद्य ठरविण्यात आले आहे. हे पहाणे औचित्याचे ठरणार आहे .