सिंधुदुर्ग: देशभक्त शंकरराव गवाणकर बी एम एस कॉलेजच्या माध्यमातून लवकरच मळगाव येथे भव्य दिव्य जागेत आणि इमारतीत एमबीए व मेडिकल असे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांचा आहे. मळगाव येथे भव्य दिव्य जागेत येत्या काळात मेडिकल शैक्षणिक उपक्रम आणि अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत आणि या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक शैक्षणिक हब निर्माण केले जाणार आहे. असे प्राचार्य यशोधन गवस यांनी स्पष्ट केले.
देशभक्त शंकरराव गवाणकर बी. एम. एस. कॉलेज आहे. आता यामध्ये प्रगती होऊन एम.बी.ए. अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. या कॉलेजमध्ये शिकलेल्या विद्यार्थी हा आदर्शवत आणि पुढील जीवनात यशस्वी होतो अशी या कॉलेजची ख्याती आहे. या कॉलेजमध्ये शिकलेला विद्यार्थी कुठेही कमी पडणार नाही. असा या कॉलेजमध्ये दर्जेदार आणि जीवनात यशस्वी कसं व्हायला हवं? हे शिकवलं जातं. म्हणून विद्यार्थ्याने कॉलेज निवडताना आदर्शवत कॉलेज निवडायला हवे. असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तरुण भारत चे पत्रकार तथा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत यांनी स्पष्ट केले. देशभक्त शंकरराव गवाणकर बी एम एस कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण व तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट संतोष सावंत उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य यशोधन गवस प्रा. साईप्रसाद पंडित, प्रा. एल पी पाटील, प्रा. अस्मिता गवस, प्रा आनंद नाईक आधी उपस्थित होते. यावेळी वर्षभरात विविध शैक्षणिक व क्रीडा उपक्रम राबवण्यात आले. त्या यशस्वी विद्यार्थ्यांना परमानंद पत्र व भेटवस्तू देऊन श्री सावंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी वर्षभरात बेस्ट स्टुडन्ट तृतीय वर्ष भावेश पाटील. बेस्ट गर्ल्स दिव्या काकतकर या दोन विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले तर यंदाचा चॅम्पियनशिप द्वितीय वर्ष ग्रुपने पटकावले त्यांचा चषक व प्रमाणपत्र भेटवस्तू देऊन श्री सावंत व गवस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना एडवोकेट सावंत पुढे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी गेल्या दहा बारा वर्षांपूर्वी या जिल्ह्यात बी एम एस कॉलेज सुरू केले आणि एक शैक्षणिक नवी दिशा सर्वसामान्य गोरगरिबांना उपलब्ध करून दिली. आज हे कॉलेज एमबीए पर्यंत मजल मारत आहे. ज्या संस्थेत आपण शिकतो ती संस्था आदर्शवत आहे. याचं भान विद्यार्थ्यांना असायला हवा हे कॉलेज एक आदर्शवत असे कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये शिकलेला विद्यार्थी जेव्हा शिकून बाहेर पडतो तेव्हा निश्चितच तो जीवनाची दिशा यशस्वी करतो. तुम्ही आता तृतीय वर्ष पूर्ण करून आता तुम्ही या कॉलेजमधून जाणार आहात. मात्र तुम्ही जेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्या नव्या दिशेला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला तुमचे कॉलेजचे दिवस आठवायला हवेत आणि आपले कॉलेज मोठे व्हायला हवे. या दृष्टीने तुम्ही नेहमी प्रयत्न करा जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपले आई-वडील आणि गुरुजन यांचा आधार आणि त्यांचा मानसन्मान ठेवायला शिका. महान व्यक्ती तसेच देशभक्त अशा व्यक्तींचा इतिहास जाणा आजचा युग हे मार्केटिंगचे युग आहे. तुम्ही मार्केटिंग आणि मॅनेजमेंट यामध्ये तरबेज व्हा आपली दिशा आणि आपले विचार आणि आपले संस्कृती पारदर्शक असायला हवी यश गाठण्यासाठी खूप मेहनत आणि परिश्रम करायला हवेत यश सहजासहजी मिळत नाही. अध्यात्म विज्ञान आणि नवतंत्रज्ञान याची सांगड घालत तुम्ही तुमचा प्रवास सुरू ठेवा यश सगळ्यांनाच मिळत असतं तर ते यश काही जणांना लवकर मिळतं तर काही जणांना उशिरा मिळतं पण या सर्वांसाठीच खुला आहे.ते यश चाखायला मिळवण्यासाठी थोडा धीर धरायला हवा असे ते म्हणाले यावेळी प्राचार्य यशोधन गवस यांनी तुम्ही विद्यार्थी आता तृतीया वर्षा पूर्ण करून जात आहात.या कॉलेजमध्ये ६०० विद्यार्थी आतापर्यंत शिकून गेले आहेत. ते अनेक क्षेत्रात बँकिंग विविध कंपन्यांमध्ये यशस्वी कारकिर्दी घडवीत आहेत. काही मुलं परदेशातही आपलं करिअर करत आहेत. आता येत्या काळात एमबीए चा अभ्यासक्रमही सुरू केला जाणार आहे. असं ते म्हणाले.
यावेळी प्राध्यापक एल पी पाटील यांनी विद्यार्थ्यांनी अफाट व परिश्रम करायला हवेत. पुढील काळा हा खडतर काळ आहे. त्यातही तुम्ही यशस्वी व्हा असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बेस्ट स्टुडन्ट भावेश पाटील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी जुएल रॉड्रिग्ज यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्राध्यापक साईप्रसाद पंडित आभार विद्यार्थ्यांनी कुमारी पेडणेकर हिने मानले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो: सावंतवाडी सावंतवाडीतील देशभक्त शंकरराव गवाणकर बी एम एस कॉलेज च्या वार्षिक पारितोषिक वितरण व तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तरुण भारत चे पत्रकार तथा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना प्राचार्य यशोधन गवस बाजूला एल पी पाटील श्री नाईक आदी