Home स्टोरी विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देणेस शिशु विकास मंदिर कटीबध्द – महेश इंगळे 

विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देणेस शिशु विकास मंदिर कटीबध्द – महेश इंगळे 

135

 

 

वटवृक्ष देवस्थानकडून विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्यांचे वाटप

 

वटवृक्ष देवस्थानच्या श्री स्वामी समर्थ शिशू विकास मंदिराचे उपक्रम

 

मसुरे प्रतिनिधी: 

 

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे तत्कालीन माजी चेअरमन कै.कल्याणराव [बाळासाहेब] इंगळे यांनी २१ वर्षांपूर्वी अक्कलकोट शहरातील सर्वसामान्य पालकांची पाल्ये शिक्षणापासून वंचित राहू नये यानिमीत्ताने गोरगरीब घराण्यातील बालकांची शिक्षणाची गरज ओळखून देवस्थानच्या वतीने संस्थेच्या विठ्ठल मंदिर येथे श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिर या नावे शिशु विकास मंदिराची स्थापना करून बालकांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. आज या विद्या मंदिरात जवळपास २०० बालक मोफत शिक्षणाचा लाभ घेत आहेत. आधुनिक काळातील इंग्रजी शिक्षणाची गरज ओळखुन गेल्या १० वर्षांपासून इंग्रजी विषयही शिकविण्यात येत आहे. याकरिता आमच्या पाठीशी श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद व प्रेरणा आहेत. या प्रेरणेतून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणेस देवस्थानचे हे श्री स्वामी समर्थ शिशुविकास मंदिर कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. देवस्थान संचलित श्री स्वामी समर्थ शिशु विकास मंदिर येथे ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर बालकांकरिता सालाबादाप्रमाणे यंदाही मोफत गणवेश व आवश्यक ते सर्व शैक्षणिक साहित्यांचे वाटप, शिक्षिकांना साड्यांचे वाटप देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे व सचिव आत्माराम घाटगे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी महेश इंगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या, विठ्ठलाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापिका स्वाती गाडे जाधव यांनी केले, तर आभार सचिव आत्माराम घाटगे यांनी मानले. याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, मुख्याध्यापिका स्वाती गाडे, शिक्षिका शशिकला मडीखांबे, वंदना शिर्के, जयश्री माने, गिरीश पवार, संजय पवार, सागर गोंडाळ, व विद्यार्थ्याचे पालक आदी उपस्थित होते.