व्ही. पी. कॉलेज माडखोल येथे डी. फार्म, बी. फार्म कोर्ससाठी मुलींना शिक्षण शुल्कात १००% सवलत.
सावंतवाडी: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या दि. ८ जुलै २०२४ च्या निर्णयानुसार खुल्या व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १००% सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे.
सदरील महाराष्ट्र शासनाची सवलत व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल ता. सावंतवाडी या महाविद्यालयात डी.फार्म व बी. फार्म या अभ्यासक्रमासाठी लागू करण्यात आलेली आहे. या शासनाच्या निर्णयाने विद्यार्थिनींना तसेच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सदरील शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयास संपर्क क्रमांक 9763824245 यावर साधावा, असे आवाहन करण्यात आले हे.