कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): नेतीवली ते लोकधारा विज पारेषण केंद्र या सुमारे अडीच किलो मिटरच्या भूमिगत विज वाहिणी मध्ये (केबल ) दोष निर्माण झाला असल्याने रात्री उशीरा कल्याण पूर्वेतील काही भागाचा विज पुरवठा खंडीत झाला आहे .काही विभागात पर्यायी व्यवस्था करून विज पुरवठा सुरु करण्यात आला आहे. परंतु केबल मध्ये नक्की कोणत्या ठिकाणी दोष निर्माण झाला आहे ते शोधण्याचे काम चालु असुन दोषाचे ठिकाण सापडल्या नंतर दोष दुरुस्ती तत्परतेने करण्यात येवून संपूर्ण संपूर्ण विभागाचा विज पुरवठा पुर्ववत करण्यात येईल .या कामासाठी सुमारे ५ ते ६ तासांचा कालावधी लागू शकतो. अशी माहीती विज वितरण कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे .