Home राजकारण विजय वडेट्टीवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात गंमतशिर टोलेबाजी!

विजय वडेट्टीवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात गंमतशिर टोलेबाजी!

43

चंद्रपुर जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या कार्यक्रमात काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातील टोलेबाजी चांगलीच रंगली. शाकाहारी असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना उद्देशून वडेट्टीवारांनी मंचावरील सर्वांनी मांसाहार सुरू केला पाहिजे, असे वक्तव्य केले. मात्र लगेच मुनगंटीवार यांना वगळून हा सल्ला असल्याचे सांगताच कार्यक्रमात हास्यमय वातावरण बघायला मिळाले. आपल्या भाषणात मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मी शाकाहारी असलो तरी महात्मा गांधींची प्रेरणा घेणारा असल्याचे वक्तव्य केले. गांधीजी कधीही टोपी घालत नसत. मात्र इतरांना ती घालण्याचा आग्रह करीत असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. मी शाकाहारी असलो तरी मत्स्यव्यवसाय विभागाचा मंत्री म्हणून खवय्यांची सोय होईल. याकडे लक्ष पुरवणार असल्याचे मिश्कील उत्तर मुनगंटीवार यांनी दिले.विजय वडेट्टीवार म्हणाले, मंचावरच्यांनी दुसऱ्याला मासे खा असे सांगण्यापेक्षा मंचावरच्या सगळ्यांनी मासे खाणे सुरू केले पाहिजे. मग, हा व्यवसाय वाढेल. सुधीरभाऊ तुम्हाला म्हणत नाही. कारण तुम्ही खात नाही. पण, मत्स्य खाण्याचे फायदे काय असावेत, हे सांगितलं पाहिजे. यावेळी मंचावर मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. त्यांना पाहूनच विजय वडेट्टीवार यांनी हा टोला लगावला.विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मला मस्त्यपालन विभाग दिला. मी अर्ध्या तासात फोन करून सांगितलं. मी मासे खात नाही. त्यामुळे हा विभाग तुम्ही काढून घ्या. त्या मोबदल्यात मला दुसरा कोणताही विभाग दिला नाही. तरी काहीही वाटणार नाही. मी मासे खात नाही. म्हणून मला हा विभाग देऊ नका. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मंचावरील सर्वांनी मासे खाल्ले पाहिजे. पण, मी मासे खात नाही. राष्ट्रपीता महात्मा गांधी स्वतः टोपी घालतं नव्हते. इतरांना टोपी घालण्याचा आग्रह करत असत. मी मासे खात नसलो, तरी खाणाऱ्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी निश्चितपणे करतो, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.