Home स्टोरी विकासाशी संबंधित कामांमध्ये कोणताही अडथळा येऊ देऊ नका! पंतप्रधान मोदींचे आवाहन

विकासाशी संबंधित कामांमध्ये कोणताही अडथळा येऊ देऊ नका! पंतप्रधान मोदींचे आवाहन

43

केंद्रीय तपास संस्थांचा अनिर्बंध वापर केला जात असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना त्यांची याचिका फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिला, अशी टीका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनानंतर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? आम्ही किंवा आमच्या पक्षाने केलेल्या भ्रष्टाचाराची कोणीही चौकशी करू नये, म्हणून संरक्षण मागण्यासाठी काही पक्ष काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात गेले होते. पण न्यायालयाने त्यांना धक्का दिला,’’ असे मोदी यांनी विरोधी पक्षांचा नामोल्लेख टाळून सांगितले. राज्य सरकारच्या सहकार्याअभावी केंद्र सरकारचे अनेक विकास प्रकल्पांना विलंब होत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारवर केला. सिकंदराबाद ते तिरुपतीदरम्यानच्या ‘वंदे भारत’ रेल्वे गाडीच्या उद्घाटनासह पंतप्रधानांच्या अन्य कोणत्याही कार्यक्रमास मुख्यमंत्री राव उपस्थित राहिले नाहीत. गेल्या वर्षभरापासून राव पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहणे टाळत आले आहेत. राज्य सरकारच्या असहकार्यामुळे तेलंगणातील नागरिकांचेच नुकसान होत असल्याचे नमूद करून पंतप्रधान मोदी यांनी विकासाशी संबंधित कामांमध्ये कोणताही अडथळा येऊ देऊ नका, असे आवाहन केले.