Home स्टोरी वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी

वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी

99

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सध्या देशातील सर्वच भागातील रस्ते दर्जेदार बनत आहेत, याचे श्रेय गडकरी यांनाच आहे. सत्ताधारीच नव्हे तर विरोधक सुद्धा गडकरी यांच्या कार्याचे कौतुक करतात. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा अनेक वेळा गडकरी यांचे कौतुक केले आहे. त्यातच आता नितीन गडकरी यांनी वाहन चालकांसाठी एक अपडेट दिली आहे. अर्थात ही बातमी वाहन चालकांना दिलासा देणारी आहे. देशातील महामार्गावरून जाणाऱ्या चालकांना विविध सुविधा दिल्या जातात. आता गडकरी यांनी दिलेल्या नव्या माहितीनुसार मोदी सरकार टोल टॅक्सच्या नियमात महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. विशेष म्हणजे याचा फायदा देशातील करोडो वाहनधारकांना होण्याची शक्यता आहे. चालू वर्ष अखेर संपूर्ण देशात सुमारे २६ ग्रीन वे एक्सप्रेस बांधले जाणार आहेत. यानंतर नवीन टोल नियम होतील, अशी महत्त्वाची माहिती गडकरी यांनी दिली. शिवाय टोल टॅक्स वसुलीसाठी सरकार दोन पर्यायांवर विचार करत आहे. गाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवणे हा यातील पहिला पर्याय आहे. तर दुसरा पर्याय आधुनिक नंबर प्लेटशी संबंधित आहे. दरम्यान या संबंधित नियोजन सुरू असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

टोल टॅक्स वाचवण्यासाठी वाहन चालक अनेक मार्गाचा अवलंब करतात. टोल टॅक्स चुकवल्यानंतर सध्या तरी कुठल्याही प्रकारच्या दंडाची तरतूद नाही. मात्र आता या नियमात बदल होण्याची शक्यता आहे. टोल टॅक्स वसूल करण्यासाठी मोदी सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. एखाद्या टोल नाक्यावर तुम्हाला टोल भरावा लागणार नाही. आता थेट तुमच्या खात्यातून रक्कम कापली जाईल असेही गडकरी यांनी सांगितले. यासाठीचे विधेयक लवकरच मांडण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. टोल टॅक्स कमी होईल, असे संकेत गडकरी यांनी दिले.