Home स्टोरी वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे विरोधक आक्रमक!

वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे विरोधक आक्रमक!

233

१३ जून वार्ता: वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळे काही वारकरी जखमी झाले आहेत. या प्रकरणानंतर वारकरी सांप्रदायाकडून खंत व्यक्त करण्यात आली. भागवत संप्रदायाच्या ३५० वर्षांच्या इतिहासात अशी कुठलीही घटना घडली नव्हती. या घटनेने वारकऱ्यांच्या श्रद्धा, आस्था आणि परंपरेला काळीमा फासला गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, माजी गृहमंत्री आमदार रमेश बागवे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड यांनी या सन्मान दिंडीचे नेतृत्व केले. ही वारकरी सन्मान दिंडीची अलका टॉकीज चौकापासून काढण्यात आली होती. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. तसेच हातात ‘आम्ही वारकऱ्यांच्या सन्मान करतो’, ‘आमची संस्कृती वारकरी संप्रदाय’, ‘महाराष्ट्राचा अभिमान’ असे फलक घेऊन वारकऱ्यांना पाठिंबा दर्शविला