सावंतवाडी प्रतिनिधी: शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी पावसात चौकूळ चिखलव्हाळ बेरडकी येथील सभामंडपाची पत्र्याची शेड उडून नजिकच्या जागेत कोसळली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला मात्र या घटनेत सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले. शुक्रवारी रात्रीपासून चौकोन परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. याच दरम्यान या सभामंडपाची पत्राची शेड उडून ती लगतच्या जागेत कोसळली. मध्यरात्रीच्या वेळी घटना घडल्यामुळे या सभामंडपात कोणी नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला. चौकुळचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी जात या नुकसानीची पाहणी केली.