Home स्टोरी लोक गौरव पुरस्काराने अक्कलकोट देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे सन्मानित!

लोक गौरव पुरस्काराने अक्कलकोट देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे सन्मानित!

60

मसुरे प्रतिनिधी: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरास रोज विविध स्वामी भक्त भेटी देत असतात. सर्वांना  स्वामी दर्शनाचे नियोजन, भक्ती, सेवाभाव व सहकार हे सुत्र अंगिकारून येथील देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे यांनी स्वामी सेवेकरीता भरीव योगदान देत आपले जीवन भक्ती, सेवा व सहकाराकरिता समर्पित केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शासन बातम्या राज्यस्तरीय लोक गौरव पुरस्काराने महेश इंगळे याना सन्मानित करण्यात आले.  पुरस्कार समितीचे अध्यक्ष निलेश अनभवणे यांनी केले.अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांना शासन बातम्या राज्यस्तरीय लोक गौरव पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार समितीचे अध्यक्ष निलेश अनभवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  निलेश अनभवणे म्हणाले,  येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानने अलीकडील काळात धार्मिक, आध्यात्मिक, व भाविकांना स्वामी दर्शन सेवाकार्यात भरीव योगदान देत  स्वामी सेवेचे व्रत जोपासले आहे. या कार्यास मंदिर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांचे भरीव योगदान लाभले असल्याने हे सर्व शक्य होत आहे.  महेश इंगळेंचे जीवन भक्ती, सेवा व सहकाराने परिपूर्ण असल्याने  जानेवारी २०२० साली बिहार येथील विक्रमशीला हिंदी विद्यापीठच्या वतीने सोलापूर विद्यापीठाचे तत्कालीन प्रथम कुलगुरू डॉ.इरेश स्वामी, व विक्रमशीला विद्यापीठाचे तत्कालीन उपकुलगुरु डॉ. संभाजी बावीस्कर यांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्कार, महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने  राज्य स्तरीय नवरत्न पुरस्कार, महाराष्ट्र सर फौंडेशनच्या वतीने ऑक्टोबर २०१८  रोजी सर पुरस्कार आदी पुरस्कारांसह त्यांचे आजपर्यंत अनेक छोट्या-मोठ्या पुरस्काराने सन्मान झालेले आहेत. यावेळी पुरस्कार समितीचे प्रथम अनभवणे, रामनाथ कोळी, अमर कोळी, राहूल तेंडूलकर आदींसह अरुण विभुते काका सुतार, मंदिर समितीचे आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, संतोष जमगे व स्वामी भक्त उपस्थित होते. फोटो: अक्कलकोट येथे लोक गौरव पुरस्काराने श्री वटवृक्ष स्वामी  मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळेंचा सन्मान करताना निलेश अनभवणे व अन्य छाया: स्वामी आर्टस्