Home स्टोरी लोकहितासाठी धडपडणाऱ्या सामाजिक बांधिलकीच्या मागण्याकडे प्रशासनाने गांभीर्य लक्ष द्यावे :- रवी...

लोकहितासाठी धडपडणाऱ्या सामाजिक बांधिलकीच्या मागण्याकडे प्रशासनाने गांभीर्य लक्ष द्यावे :- रवी जाधव*

194

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरांमधील तसेच इतरही आजूबाजूच्या गावांमधील लोकहित जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कोरोना काळामध्ये, नैसर्गिक आपत्ती महापुरामध्ये तसेच संकट असलेल्या लोकांसाठी व निराधारांसाठी गेली कित्येक वर्ष निस्वार्थ व प्रामाणिकपणे आपला महत्त्वाचा वेळ देऊन सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते सेवाभावी कार्य करत आलेले आहे. शहरातील लोकांसाठी धोकादायक असलेल्या घटकांची माहिती घेऊन प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत असतात. उदाहरणार्थ शहरांमधील उघडी घटारे, रस्त्यामध्ये पडलेले मोठमोठे खड्डे, कोसळायला आलेली घळण, धोकादायक विद्युत पोल व विद्युत वाहिनी, तसेच रस्त्याच्या बाजूला असलेली धोकादायक झाड या सर्व घटनांचा क्रम करून हे सर्व विषय एखादी दुर्घटना घडण्याअगोदर प्रशासनाकडे या संस्थेमार्फत मांडले जातात. आणि याच संदर्भातील पंधरा दिवसांपूर्वी जिमखाना ग्राउंड जवळील बेळगाव हायवेवर असलेले मोठे झाड व त्याच्या सुकलेल्या फांद्या रस्त्यावर सतत मोडून पडत असतात याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रसार माध्यमातून याची कल्पना देऊन देखील अद्यापही सदर सुटलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आले नाही. आज दिनांक ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सुकलेली मोठी फांदी हवेच्या मधोमध पडली परंतु त्या क्षणाला ये-जा करणार वाहन नसल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. वादळी पावसाचे दिवस असल्याकारणाने प्रशासनाने या सर्व विषयावर गांभीर्याने लक्ष देऊन लोकांचे हित जपणाऱ्या सामाजिक बांधिलकीच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी कळकळीची मागणी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा करण्यात येत आहे.