Home स्टोरी ललित मोदिंमुळे राहुल गांधींच्या अडचणीत वाढ?

ललित मोदिंमुळे राहुल गांधींच्या अडचणीत वाढ?

97

ललित मोदी याने राहुल गांधी यांना उघडपणे पप्पू म्हणत राहुल गांधी आता सामान्य नागरिक असल्याचे म्हटले आहे. मोदी याने भले मोठे ट्विट केले आहे. ”राहुल गांधी मला फरार म्हणत आहेत, परंतू त्यांच्याकडे याचे काय पुरावे आहेत. कोणत्या आधारे मला फरार म्हणत आहेत. मला कुठे दोषी ठरविले गेले आहे का? त्यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते माहिती न ठेवता बदल्याचे राजकारण करत आहेत.”, असे ललित मोदीने म्हटले आहे.

तसेच मी या विरोधात राहुल गांधींवर युकेच्या कोर्टात खटला दाखल करणार आहे. मला खात्री आहे की ते माझ्याविरोधात सर्व ठोस पुरावे घेऊन येतील. राहुल गांधी स्वत:ला कसे मुर्ख बनवून घेतात हे मला पहायचे आहे. आर के धवन, सीताराम केसरी, मोतीलाल व्होरा, सतीश शर्मा, एनडी तिवारी रहे सर्व गांधी कुटुंबाशी संबंधीत आहेत. यांच्या परदेशात मालमत्या कशा आहेत? हे कमलनाथना विचारा, असा आरोपही ललित मोदीने केला आहे.