Home स्टोरी रोहित सावंत याच्या कडून शैक्षणिक साहित्य वाटप…!

रोहित सावंत याच्या कडून शैक्षणिक साहित्य वाटप…!

234

मसुरे प्रतिनिधी:श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब ( रजि) मंडळाचे आजीव सभासद श्री. राजेद्र मुरारी सावंत( गावठणवाडी) यांचा मुलगा कु. रोहित राजेद्र सावंत याच्या वाढदिवसा निमित्त पळसंब शाळा न. १ व अंगणवाडीच्या मुलांना वहया , पेन , कॅटबरी वाटप करण्यात आले.

त्यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष श्री. रविकांत सावंत, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावंत, शिक्षणप्रेमी व मंडळाचे उपाध्यक्ष श्री.अमरेश पुजारे, मंडळाचे सचिव माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, श्री. पिंट्या सावंत, शाळा शिक्षिका सौ. योगिता पवार, सौ.कोकरे, शाळेतील मुले उपस्थित होते. रोहित सावंत मुंबईत शाळेत असून गावातील शाळेतील मुलांबद्दल विशेष आस्था आहे. गावातील प्रत्येकाने आपला वाढदिवस शाळेतील मुलां समवेत साजरा करून मुलांचा व आपला आनंद द्विगणीत करावा यासाठी मंडळ नेहमीच सकारात्मक राहिल असे अध्यक्ष उल्हास सावंत म्हणाले. सौ योगिता पवार यांनी रोहित सावंत व पालकांचे अभिनंदन करत पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.