Home स्टोरी रोटरी क्लब मुंबई – माहीम’ मार्फत वडाचापाट हायस्कुलला प्रिंटर प्रदान 

रोटरी क्लब मुंबई – माहीम’ मार्फत वडाचापाट हायस्कुलला प्रिंटर प्रदान 

99

मालवण प्रतिनिधी: 

 

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट या प्रशालेस  रोटरी क्लब मुंबई, माहीम मार्फत  ‘कलर प्रिंटर ‘ प्रदान करण्यात  आला. त्याचप्रमाणे प्रशालेतील विद्यार्थिनी लतिका दीपक सावंत हिला एक सायकल प्रदान करण्यात आली.

 

या कार्यक्रमावेळी सौ.प्रज्ञा सबनीस – अध्यक्ष (रोटरी क्लब मुंबई, माहीम) या प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या.  त्याचप्रमाणे श्रीमती शैला रेगे -खजिनदार,(रोटरी क्लब मुंबई माहीम) श्रीमती उमा सहस्त्रबुद्धे (माजी अध्यक्ष रोटरी क्लब मुंबई माहीम), श्री धनंजय पटवर्धन (विश्वस्त व माजी अध्यक्ष ),श्री किशोर परुळेकर (माजी अध्यक्ष ),डॉ.सुप्रिया सापळे, श्री प्रदीप पाटोळे, सौ सीमा पाटोळे, श्रीमती वृषाली कोल्हटकर,  सौ सायली चव्हाण इत्यादी सदस्य उपस्थित होते.  या कार्यक्रमासाठी श्री दीपक भोगटे ( कार्याध्यक्ष बॅ.नाथ पै सेवांगण, मालेवण) व सौ रश्मी पाटील सदस्य रोटरी क्लब यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले .त्याचप्रमाणे श्री दिलीप नलावडे (विश्वस्त को-ऑपरेटिव्ह बँक) यांचीही उपस्थिती लाभली.

 

या कार्यक्रमावेळी व्यवसाय अभ्यासक्रम ( मल्टी स्किल असिस्टंट टेकनीशियन )अंतर्गत विविध वस्तूचे  प्रदर्शन मांडण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी विभागांतर्गत नारळ सोलणी यंत्र, चप्पल स्टॅन्ड, सॅनिटायझर स्टॅन्ड, शेती पशुपालन विभाग अंतर्गत- गांडूळ खत, विविध कीटकनाशके, गृह आरोग्य विभाग अंतर्गत- वेगवेगळ्या पाककृती शोभेच्या वस्तू,  ऊर्जा पर्यावरण विभागांतर्गत  ताक घुसळणी यंत्र इत्यादी वेगवेगळे मॉडेल्सचे  प्रदर्शन  मांडण्यात आले.यासाठी निदेशक केशव भोगले, जगन्नाथ आंगणे, हर्षदा पाटकर. कविता माडये यांचे मार्गदर्शन लाभले या विभागांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची उद्योजकतेच्या दृष्टीने वाटचाल होत आहे असे समाधान व्यक्त करत,रोटरी क्लब मुंबई, माहीम च्या अध्यक्षा सौ.प्रज्ञा सबनीस – यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

 

 

या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र टॅलेंट सर्च प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कुमार तन्मय राणे (इयत्ता आठवी), कुमारी गायत्री शिंदे (इयत्ता आठवी), कुमार विराज परब (इयत्ता नववी) कुमार विराज मांजरेकर (इयत्ता दहावी) कुमार प्रणित पालव (इयत्ता दहावी) या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथी सौ प्रज्ञा सबनीस (अध्यक्ष रोटरी क्लब मुंबई माहीम )यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रसाद कुबल यांनी  प्रशालेची प्रगती आणि वाटचाल आपल्या प्रास्ताविकेतून सादर केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कु.प्रतिभा केळुसकर  यांनी तर आभार  सौ प्रिती सनये  यांनी मानले. या कार्यक्रमाच्या वेळी प्रशालेतील शिक्षिका पूजा कुडाळकर तसेच विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.संस्था अध्यक्ष मा. विजय पाटकर, ऑन. जन. सेक्रेटरी श्री साबाजी करलकर. कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट चे अध्यक्ष सुधीर हेरेकर यांनी रोटरी क्लब माहीम मुंबई तील सर्व पदाधिकारांचे आभार मानले.