Home राजकारण रोग हाल्याला अन् इंजेक्शन…”, एसटी कर्मचाऱ्याला निलंबन केल्यावरून अजित पवार यांची शिंदे...

रोग हाल्याला अन् इंजेक्शन…”, एसटी कर्मचाऱ्याला निलंबन केल्यावरून अजित पवार यांची शिंदे सरकारवर टीका

81

एसटीच्या मोडक्या, तुटक्या व भंगार बसवर राज्यशासनाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला…’ असा प्रकार असल्याची जोरदार टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांवर केली. तसेच, संबंधित कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.अजित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषण प्रस्तावावर बोलताना, मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेली राज्य शासनाची जाहीरात, भंगार, तुटक्या, फुटक्या, एसटी बसवर लावण्यात आल्याचं छायाचित्र दाखवले होतं. “राज्य शासनाकडून सुरु असलेली जाहीरातींवरची उधळपट्टी कमी व्हावी आणि तो निधी एसटीच्या सुधारणांसाठी, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी, खर्च व्हावा, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे काही घडले नाही. अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली होती.या जाहिरातीनंतर भंगार एसटीची सुधारणा करण्याऐवजी उलट, सरकारने भूम एसटी आगाराचे वाहन परीक्षक डी. बी.‎ एडके, एस. एन. हराळ, ए. यु. शेख‎ या तिघांना निलंबित केलं. खिडक्या नसणारी‎ एसटी बस फेरीसाठी बाहेर‎ काढण्यास कारणीभूत असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवला. सरकारचा हा निर्णय म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला…’,” अशी टीका अजित पवारांनी आज केली आहे.