Home स्टोरी रेल्वेतून पडून वैभवशाली पथसंस्थेचे संचालक संदीप हरी पारकर यांचे दुःखद निधन!

रेल्वेतून पडून वैभवशाली पथसंस्थेचे संचालक संदीप हरी पारकर यांचे दुःखद निधन!

176

सिंधुदुर्ग: चिंदर येथील प्रथतियस व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि वैभवशाली पथसंस्थेचे संचालक संदीप हरी पारकर वय वर्ष ५८ राहणे चिंदर, भटवाडी यांचे आज गुरुवारी सकाळी रेल्वेतून पडून दुःखद निधन झाले आहे.संदीप पारकर हे चिंदर मधील भगवत मंगल कार्यालय आणि पारकर टी हाऊस चे मालक होते. चिंदर मधील प्रत्येक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा हिरहिरीने सहभाग असायचा. ते भगवती उत्साही मंडळाचे खजिनदार आणि आधारस्तंभ होते. चिंदर येथील रामेश्वर देवस्थान समितीचे ते सचिव होते. तर आचरा येथील वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्थेचे ते संचालक होते. रवळनाथ मंदिराचा जिर्णोद्वार त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला होता. मनमिळावू आणि शांत स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. कोणत्याही प्रसंगी मदतीसाठी ते सदैव तत्पर असायचे. संदिप पारकर यांच्या दुःखद निधनाने चिंदर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे.