Home स्टोरी रेडी येथील यशवंतगडाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी रुपये खर्च! पुरातत्व विभागाच्या रत्नागिरी येथील...

रेडी येथील यशवंतगडाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी रुपये खर्च! पुरातत्व विभागाच्या रत्नागिरी येथील कार्यालयाकडून देण्यात आली माहिती

67

सिंधुदुर्ग: युनेस्कोच्या सूचित समाविष्ट असलेल्या यशवंतगडाची डागडुजी करणे आणि नवीन चिर्‍याचे बांधकाम करणे यांकरता आतापर्यंत शासनाकडून ५ कोटी ५८ लाख ४५ सहस्र ८४५ रुपये निधी पूर्णपणे खर्ची पडला आहे, अशा माहितीचे पत्र महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. वि.पुं. वाहणे यांनी येथील शिवप्रेमी राजन रेडकर यांना दिले आहे.शिवप्रेमी श्री. रेडकर आणि त्यांचे सहकारी यांनी यापूर्वी यशवंतगडाच्या नजीक झालेले अवैध उत्खनन आणि बांधकाम यांच्या विरोधात आवाज उठवला होता. तसेच हे कृत्य करणार्‍यांवर कारवाई व्हावी, यासाठी उपोषण केले होते. या अनुषंगाने श्री. रेडकर यांनी पुरातत्व खात्याने यशवंत गडाच्या संवर्धनासाठी आतापर्यंत किती निधी खर्च केला याची माहिती मागितली होती. ‘‘पुरातत्व खात्याने केलेला खर्च गावातील किती लोकांना ठाऊक आहे ? जनता जो कर भरते, त्याचा विनियोग कसा होतो ? त्याकडे प्रत्येक गावातील नागरिकांचे लक्ष हवे.

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन रेडकर
वेंगुर्ला तहसीलदार प्रविण आबाजी लोकरे

सर्वसाधारणपणे साडेपाच कोटी रुपये खर्च होत असतांना स्थानिकांना त्याविषयी माहितीही नसावी, हे आश्चर्यकारक आहे. या खर्चाला शासकीय भाषेत काय म्हणायचे?’’, असा संतप्त प्रश्न श्री. रेडकर यांनी उपस्थित केला आहे.काहींच्या म्हणण्यानुसार शिवप्रेमी यशवंतगडाचे संवर्धन आणि जतन होण्यासाठी येथे कार्यरत असतात. सध्या गडावर स्वच्छता दिसते, त्यात शिवप्रेमींचा त्याग मोठा आहे. शिवप्रेमी सातत्याने येथे कार्यरत नसतात, तर पुरातत्व खात्याने या गडाची अशी निगा राखली असती का? हा मोठा प्रश्न आहे.