Home स्टोरी रुग्णवाहिकेवर कायमस्वरूपी २४ तास वाहन चालक राहील याची दक्षता घ्यावी! वीरेश ठाकूर

रुग्णवाहिकेवर कायमस्वरूपी २४ तास वाहन चालक राहील याची दक्षता घ्यावी! वीरेश ठाकूर

136

सावंतवाडी: नगरपरिषदेतील रुग्णवाहिकेस कायमस्वरूपी वाहन चालक नेमाण्यात यावा आणि शहरवासियांना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेचा उपयोग व्हावा यासाठी शहरातील श्री वीरेश ठाकूर यांचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना निवेदन दिलेल्या निवेदनात म्हटले कि, सावंतवाडी नगरपरिषदेस स्थानिक आमदार निधीतून वर्ष २०२२ मध्ये रुग्णवाहिका लोकार्पण केली आहे. या रुग्णवाहिकेचा वापर २४ तास वाहन चालक उपलब्ध नसल्याने रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यासाठी अभावानेच निदर्शनास येते. रुग्णवाहिका उपलब्द हवी असल्यास एक तास आगाऊ सूचना दिल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते असे कळाले. अग्निशामक सारखी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्द होणे हे रुग्णाच्या दृष्टीने गरजेचे असते. सावंतवाडी नगरपरिषदेच्या ताब्यात असलेल्या रुग्णवाहिकेवर कायमस्वरूपी २४ तास वाहन चालक राहील याची दक्षता घ्यावी अशी आपल्या कडून अपेक्षा आहे. किंवा शहरातील एखाद्या सामाजिक कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला सुपूर्द करावी. जेणे करून तिचा योग्य उपयोग होईल