Home राजकारण राहुल नार्वेकर ९ मे ते १५ मे पर्यंत लंडनच्या दौऱ्यावर….

राहुल नार्वेकर ९ मे ते १५ मे पर्यंत लंडनच्या दौऱ्यावर….

171

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल नार्वेकर एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमासाठी लंडन दौऱ्यावर जात आहेत. याशिवाय त्यांची राष्ट्रकूल मंडळासोबत एक महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीसाठी ते लंडनला रवाना होत आहेत. ते लंडनला जाऊन राष्ट्रकूल मंडळाच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करणार आहेत. ते राष्ट्रकूल मंडळाचे शिबीर मुंबईत करण्यासाठी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राहुल नार्वेकर यांचा यआधी जपान दौराराहुल नार्वेकर गेल्या महिन्यात जपान दौऱ्यावर गेले होते. त्यांच्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे देखील गेले होते. त्यावेळी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे ४० आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. त्यानंतर लगेच राहुल नार्वेकर जपान दौऱ्यावरुन मुंबईत दाखल झाले. त्यामुळे राहुल नार्वेकर जपनाचा दौरा अर्धवट सोडून परत आले, अशा चर्चा सुरु झाल्या. पण नार्वेकर यांनी आपण जपानमधील सर्व कामे करुन परतलो आहोत. दौरा अर्धवट सोडून आलो नाही, असं स्पष्टीकरण दिलं होतं.