Home Uncategorized राज ठाकरेंना पत्र लिहित मनसेच्या बड्या नेत्याचा राजीनामा…

राज ठाकरेंना पत्र लिहित मनसेच्या बड्या नेत्याचा राजीनामा…

90

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून एका बड्या नेत्याने राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधीच मनसेच्या दिग्गज नेत्याने राजीनामा दिल्याने राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. मनसेचे मसल मॅन अशी ओळख असलेल्या मनिष धुरी यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून तडकाफडकी राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच राज ठाकरेंना पत्र लिहून त्यांनी राजीनामा दिला आहे. कोण आहेत मनिष धुरी? मनिष धुरी यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मनिष धुरी हे मनसेचे अंधेरी विभागाचे अध्यक्ष आहेत. धुरी हे राज ठाकरेंचे भारतीय विद्यार्थी सेनेपासून कट्टर समर्थक आहेत. मनसेच्या अनेक आंदोलनात मनिष धुरी यांचा आक्रमक सहभाग असायचा. त्यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून सगळ्या पदांचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मनसेत खळबळ उडाली. धुरी यांच्या जागी अंधेरी विभाग अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे जाणार याचीही चर्चा रंगली आहे. राजीनाम्यानंतर मनीष धुरी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना एक पत्रही लिहिलं आहे. पक्षानं दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनीष धुरी यांनी या पत्रात राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. वैयक्तिक कारणामुळे सर्व पदांचे राजीनामे देत आहे. पक्षात यापुढे राज ठाकरे समर्थक म्हणून काम करेल, अन्य राजकीय पक्षात जाणार नसल्याचं मनीष धुरी यांनी या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान मनीष धुरी यांच्या राजीनाम्यामागे पश्चिम उपनगरात पक्षांतर्गत असलेली गटबाजी जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.