Home स्टोरी राज्य शासनाच्या वतीने दशावतार प्रशिक्षण शिबिर!

राज्य शासनाच्या वतीने दशावतार प्रशिक्षण शिबिर!

152

मसूरे प्रतिनिधी: सांस्कृतिक कार्यसंचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने या वर्षीचे प्रयोगात्मक कला शिबिर दशावतार प्रशिक्षण माधवाश्रम मंगल कार्यालय,रघुवीर नगर, मानपाडा रोड,डोंबिवली (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी विद्यार्थी म्हणून नावे नोंदवावीत. हे प्रशिक्षण ८ मार्च ते १८ मार्च २०२५ (निवासी) दरम्यान आहे. निवास व्यवस्था शासनामार्फत केली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिले जाईल. तरी आपली नावे त्वरित नोंदवावीत.फक्त २० प्रशिक्षणार्थींनाच प्रवेश दिला जाईल.

संपर्क : श्री. दाजी(समिर) लक्ष्मण नार्वेकर (शिबिर संचालक) 8169977986. लाभ घेण्याचे आवाहन श्रीदेवी भगवती दशावतार नाट्य मंडळ, डोंबिवली चे श्री प्रकाश लब्दे यांनी केले आहे.