Home स्टोरी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून कांदळगाव येथे काजू कलमांची लागवड

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून कांदळगाव येथे काजू कलमांची लागवड

214

 

 

मसुरे प्रतिनिधी:

 

महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषि अधिकारी मालवण यांच्या वतीने कांदळगाव येथील श्री.विश्राम तुकाराम राणे यांचे प्रक्षेत्रावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड योजनेअंतर्गत काजू कलमांची लागवड मालवण तहसीलदार श्रीम.वर्षा झालटे, मालवण तालुका कृषी अधिकारी श्री.विश्वनाथ गोसावी यांच्या हस्ते करण्यात आली. श्री.राणे यांच्या ०.२५ हेक्टर क्षेत्रावर ५० काजू कलमांची लागवड करण्यात येणार आहे.यावेळी मंडळ कृषि अधिकारी आचरा श्री.धनंजय गावडे ,मंडळ कृषि अधिकारी पोईप श्री.डि.के.सावंत, श्रीम. पर्यवेक्षक प्रणाली रेडकर, कृषी सहायक श्री.सुनिल कदम , मंडळ अधिकारी कोळंब श्रीम.पिंगुळकर श्री.निलेश गोसावी आत्मा तंत्रसहाय्यक, कांदळगाव तलाठी,श्रीम.रुद्रा राणे श्री.स्वप्निल साटम व शेतकरी उपस्थित होते.