२८ जुलै वार्ता: सध्या राज्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळं काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसेच गोंदिया जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्याचबरोबर सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.