Home राजकारण राज्यातील सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली…. सुनावणी १४ तारखेला?

राज्यातील सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली…. सुनावणी १४ तारखेला?

85

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली आहे. कोर्टाने आज दोन तासातच कामकाज संपवले. कारण आज दिवसभरामध्ये सुनावणी पूर्ण होऊ शकत नव्हती. होळीच्या सुट्टीनंतर पुढील कामकाज होणार आहे. पुढील सुनावणी १४ मार्चला होण्याची शक्यता आहे. हरिश साळवे यांनी आज सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून युक्तीवाद केला आहे. हरिश साळवे यांनी उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. त्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनवाणी आज संपणार असे जवळपस निश्चित होते. काल सरन्यायाधिशांनी तसे संकेत देखील दिले होते. परंतु आज नाट्यमयरित्या ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी ऑनलाईन हजेरी लावली.

वकील हरिश साळवे

हरिश साळवे यांनी आज सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केला. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर काय माहीत त्यांच्या आघाडीतील एखाद्या पक्षाने त्यांची साथ सोडली असती, काहीही होऊ शकले असते? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंना राजीनामा दिला तिथेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा विषय संपला. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. सध्या हे प्रकरण पुस्तकी आहे. त्यामुळे जे आमदार १६ अपात्र झाले तोच मुद्दा सुप्रीम कोर्टासमोर आहे, असे देखील हरिश साळवे यांनी म्हटले .

माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्र राज्य

राज्यपालांची भूमिका योग्य होती….. राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी बोलावले होते. परंतु उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला नकार दिला आणि राजीनामा दिला. त्यावेळी महाराष्ट्राला मुख्यमंत्री नव्हता. राज्यपालांसमोर पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेना बहुमत चाचणीसाठी बोलावले. एकनाथ शिंदे यांना बहुमत चाचणीत बहुमत मिळवण्यात यश आले. असे हरिश साळवे म्हणाले.