Home स्टोरी राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता!

राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता!

67

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या २४ तासांत काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे.महाराष्ट्र राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.